शिवसेना म्हंटलं कि पहिल नाव येत ते शिवसेना प्रमुख बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे . त्यांचे भाषण, त्यांचे व्यक्त्तिमत्व, त्यांची देहबोली या साठी ते प्रसिद्ध होते . महाराष्ट्र स्थापन झाल्यांनतर मुंबईमध्ये मराठी माणसाची गळचेपी मोठ्या प्रमाणात होत होती. अनेक मराठी तरुणांना नोकरी असो वा व्यवसाय त्यामध्ये दुय्यम वागणूक मिळत होती. हाच अन्याय मोडून काढण्यासाठी बाळ ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि मुंबई व महाराष्ट्र मध्ये ठाकरे पर्व चालू झाल. मुंबईतील व त्याच्या परिसरातील सामान्य मुलांच्या मनात शिवसेना बद्द्ल आदर वाढू लागला आणि मोठ्या प्रमाणात युवक शिवसेनेमध्ये प्रवेश करू लागले. अनेक आंदोलन झाली शिवसेनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता पण निवडणुकी मध्ये पाहिजे तस यश मिळत नव्हत. मग आता शिवसेनेनं मराठी सोबत हिंदुत्त्व हि विचारधारा पण प्रखरपणाने मांडण्यास सुरवात केली. १९८९ साली शिवसेनेनं भारतीय जनता पार्टी सोबत युती केली. दोन्ही पक्ष हिंदुत्वासाठी लढण्यासाठी एकत्र आले. शिवसेनेने त्यांच्या सुवर्ण काळात पहिले बंड बघितल ते छगन ...