शिवसेना म्हंटलं कि पहिल नाव येत ते शिवसेना प्रमुख बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे . त्यांचे भाषण, त्यांचे व्यक्त्तिमत्व, त्यांची देहबोली या साठी ते प्रसिद्ध होते . महाराष्ट्र स्थापन झाल्यांनतर मुंबईमध्ये मराठी माणसाची गळचेपी मोठ्या प्रमाणात होत होती. अनेक मराठी तरुणांना नोकरी असो वा व्यवसाय त्यामध्ये दुय्यम वागणूक मिळत होती. हाच अन्याय मोडून काढण्यासाठी बाळ ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि मुंबई व महाराष्ट्र मध्ये ठाकरे पर्व चालू झाल.
मुंबईतील व त्याच्या परिसरातील सामान्य मुलांच्या मनात शिवसेना बद्द्ल आदर वाढू लागला आणि मोठ्या प्रमाणात युवक शिवसेनेमध्ये प्रवेश करू लागले. अनेक आंदोलन झाली शिवसेनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता पण निवडणुकी मध्ये पाहिजे तस यश मिळत नव्हत. मग आता शिवसेनेनं मराठी सोबत हिंदुत्त्व हि विचारधारा पण प्रखरपणाने मांडण्यास सुरवात केली. १९८९ साली शिवसेनेनं भारतीय जनता पार्टी सोबत युती केली. दोन्ही पक्ष हिंदुत्वासाठी लढण्यासाठी एकत्र आले. शिवसेनेने त्यांच्या सुवर्ण काळात पहिले बंड बघितल ते छगन भुजबळ यांच्या रूपाने. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या आग्रहाची भूमिका घेऊन त्यांनी शिवसेनेतून काही आमदार घेऊन ते फुटले. त्यांनतर दुसरा मोठा बंड म्हणजे शिवसेनेचे धडाडी तोफ नारायण राणे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत अंतर्गत वाद झाल्यामुळे व पक्षात गळचेपी होत आहे असे कारण देऊन नारायण राणे यांनी मोठे बंड केले. अनेक आमदार सोबत घेऊन नारायण राणे काँग्रेस मध्ये गेले. आता तिसऱ्या बंडाला बंड म्हणायचं का आणखी काही, बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि स्वतःचा नवीन पक्ष स्थापन केला. पक्ष सोडताना त्यांनी माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे अस सांगून उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकार्यांवर आरोप केले.यानंतर पूल खालून बरच पाणी गेले.अनेक धक्के खात शिवसेना सावरत होती तोच मोठा धक्का शिवसेनेला परत मिळाला.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता आणि प्रचंड उलथापालथ सुरू झाली . शिंदेंनी पुकारलेलं हे बंड शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी अनाकलनीय होतं, असंच म्हणावं लागेल. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात राजकीय वादळ आले होते . शिंदे हे महाविकास आघाडी मध्ये शिवसेनेचे महत्वाचे मंत्री होते. २०१९ मध्ये भाजप सोबत युती तुटल्या नंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि शिंदेंना वाटलं कि मुख्यमंत्री होणार, पण असे काही झाले नाही आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिंदे नाराज होते अशी चर्चा होती.राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर अचानक नॉट रिचेबल झालेले एकनाथ शिंदे आधी गुजरात आणि नंतर थेट गुवाहाटीला पोहोचले. आधी १९ मग ३३ आणि आता तब्बल ४० शिवसेनेचे आमदार आणि ९ अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे करत होते . दिवसागणिक एकनाथ शिंदे गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्या वाढत चालली . गुवाहाटीतील ‘रेडिसन ब्ल्यू हॉटेल’मध्ये एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह थांबले आहेत. शिंदे गटाच्या निर्णयावर राज्यातील महाविकास आघाडी आणि राजकारणाची गणितं अवलंबून होते , असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. त्यामुळेच शिंदे काय निर्णय घेणार याकडेच राजकारण्यांसोबतच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं होते
आता एकनाथ शिंदे व बंडखोर आमदार परत येणार नाही असा उद्धव ठाकरेंना समजलच होते. त्यामुळे त्यांनी लोकांना इमोशनल आवाहन देऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.आता या खेळात भाजप जो पडद्या मागून हालचाली करत होता तो समोर येऊन शिंदेच समर्थन करू लागला. रंजक गोष्ट तर इथून चालू होते.. सगळ्यांना वाटलं कि भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील पण ते झाले नाही उलट त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्या असे आदेश आले आणि संपूर्ण देश बुचकळ्यात पडला. कोणत्याही राजकीय पंडिताने हा विचार केला नसेल ते महाराष्ट्रात झाले.शिंदेनी व बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडी मध्ये शिवसेनेची घुसमट होत आहे असे कारण देऊन बंड केलं. शिंदे या बंडाला क्रांती म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस शिवसेना संपवाट आहे असा आरोप केला आणि उद्धव ठाकरे वेळ देत नाही असं बोलून थेट ठाकरेंना आवाहन दिले.
आता खरी शिवसेना कोणती हाच प्रश्न पडला आहे. शिंदे गट का ठाकरे गट ? या बंडाला कारणीभूत मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे सुद्धा आहेत. तयांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी घरत राहून कार्यभार केला आणि संघटनेकडे दुर्लक्ष केलं त्याच्याच मुळे हे मोठे बंड झाले. अनेक शिवसेनच्या महाविकास आघाडी मधल्या मंत्र्यांना, आमदारांना उद्धव ठाकरे भेटत नव्हते. आमदार त्यांच्या मतदार संघातून मुंबईत यायचे पण खूप वेळ वाट बघून पण उद्धव ठाकरे यांच्या सोबत भेट घेत नसल्याचे आरोप अनेक आमदारांनी केले. याउलट मंत्री असलेले एकनाथ शिदे हे सगळ्या मंत्र्यांसाठी २४/७ उपलब्ध होते. मंत्री असो व आमदार शिंदेंना भेटून ते त्यांच्या तक्रारी शिंदेंना सांगत. स्थानिक पातळीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत आहे असे आरोप अनेकांनी केले. आमदारांना याची पण भीती होती पण उद्धव ठाकरे याच्या कडे दुर्लक्ष करायचे. शिवसेना आता हिंदुत्ववादी पार्टी राहिली नाही असा समज लोकांना हि होत होता याची भीती आमदारांना होती .
उद्धव ठाकरे यांना परत भाजप सोबत जायचे नव्हते पण अनेक शिवसैनिकांना भाजप सोबत युती करायची होतीच. तर शिंदेनी हेच ओळखल आणि भाजप सोबत बंड करून सरकार स्थापन केल. शिंदे साठी हे बंड सोयीचंच झालं कारण त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. आता या शिंदे गटाचे भविष्य न्यायालयाच्या हातात आहे . भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नाही पण २०१९ ला मतदारांनी कोणाला नक्की मत दिल हाच मोठा प्रश्न आहे . भाजप शिवसेनेच्या युतीला का काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीला.