राजकारण हे नाव जरी आपल्या कानी पडल तर आपण लगेच चर्चेला तयार असतो. सध्या देशात अनेक राजकीय पक्ष राजकारण करत आहे. देशातलाच नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे भाजप हा आपल्या देशात सत्ताधारी पक्ष आहे. सध्या भाजप त्याच्या सर्वोच शिखरावर्ती आहे. प्रत्येक निवडणूक ते जोमाने लढतात आणि जिंकतात सुद्धा. याच आपल्या देशात असाच एक पक्ष आहे तो त्याच्या अस्तित्वासाठी लढत आहे. ज्या पक्षाने स्वातंत्र्या आधी लढा दिला आणि स्वातंत्र्या नंतर अनेक वर्ष सत्तेत होता. भारताच्या विकासात त्याचे योगदान महत्वाचे आहे असा काँग्रेस पक्ष सध्या वाईट काळातून चालत आहे. तोच वाईट काळ दूर करण्यासाठी सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा चालू केली आहे. काँग्रेस मध्ये गांधी घराणे जे काही करेल ते त्यांच्या पक्षात सगळ्यांना मान्य असत. त्यांच्या वर आरोप सुद्धा होतो कि हा पारिवारिक पक्ष आहे. आणि काही अंशी हा आरोप खरा सुद्धा आहे. काँग्रेस मधल्याच लोकांना गांधी घराण्या बाहेरील नेतृत्व मान्य नाही. पण आता काँग्रेस मध्ये अंत...