राजकारण हे नाव जरी आपल्या कानी पडल तर आपण लगेच चर्चेला तयार असतो. सध्या देशात अनेक राजकीय पक्ष राजकारण करत आहे. देशातलाच नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे भाजप हा आपल्या देशात सत्ताधारी पक्ष आहे. सध्या भाजप त्याच्या सर्वोच शिखरावर्ती आहे. प्रत्येक निवडणूक ते जोमाने लढतात आणि जिंकतात सुद्धा.
याच आपल्या देशात असाच एक पक्ष आहे तो त्याच्या अस्तित्वासाठी लढत आहे. ज्या पक्षाने स्वातंत्र्या आधी लढा दिला आणि स्वातंत्र्या नंतर अनेक वर्ष सत्तेत होता. भारताच्या विकासात त्याचे योगदान महत्वाचे आहे असा काँग्रेस पक्ष सध्या वाईट काळातून चालत आहे. तोच वाईट काळ दूर करण्यासाठी सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा चालू केली आहे. काँग्रेस मध्ये गांधी घराणे जे काही करेल ते त्यांच्या पक्षात सगळ्यांना मान्य असत. त्यांच्या वर आरोप सुद्धा होतो कि हा पारिवारिक पक्ष आहे. आणि काही अंशी हा आरोप खरा सुद्धा आहे. काँग्रेस मधल्याच लोकांना गांधी घराण्या बाहेरील नेतृत्व मान्य नाही. पण आता काँग्रेस मध्ये अंतर्गत निवडणूक लागली आहे . हि निवडणुक नावापुरती आहे असा सुद्धा आरोप होतो आहे. एका बाजूला तथाकथित गांधी घराण्याचे जवळचे उमेदवार मालिकार्जून खर्गे विरुद्ध काँग्रेस ला नवसंजीवनी देणार असे बोलणारे व इंग्रजी भाषेत मजबूत पकड असलेले शशी थरूर. दोंघांच्यात हि नावापुरती टक्कर होईल असा असल तरी विजेता आधीच ठरला आहे असे अनेक जाणकार सांगतात.भविष्यात याचा निकाल येईल सुद्धा.
तर मूळ मुद्दा आला भारत जोडो यात्रेचा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने या यात्रेची सुरवात केली आहे. हि यात्रा कन्याकुमारी पासून सुरु पण झाली आहे ज्या मध्ये अनेक लोक राहुल यांना पाठिंबा देण्यासाठी सामील होत आहे. राहुल हे दररोज शेकडो किलोमीटर चालत आहे. त्यांना प्रतिसाद पण मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यांची भाषण असो वा तरुणांसोबतचा संवाद हे एक वाखाणण्याजोगा आहे . त्यांची पावसातली सभा हि सध्या सोसिअल मीडिया वरती ट्रेंडिंग वर आहे . अस बघायला गेले तर त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्याला परत कामाला लावलेले आहे. सध्या तरी यात्रा साऊथ इंडिया मध्ये आहे त्यामुळे यात्रेला प्रचंड प्रतिसाद आहे. हीच यात्रा जेव्हा नॉर्थ ला जाईल तेव्हा एवढाच प्रतिसाद मिळेल का हे एक विचार करण्याची गोष्ट आहे. सध्या साऊथ इंडिया मध्ये काँग्रेस चा दबदबा आहे त्यामुळे येथे लोक यात्रेत येत आहे . काही ठिकाणी ते सत्तेत पण आहेत तर काही ठिकाणी विरोधात. ज्याने कोणी हि या यात्रेचं नियोजन केले आहे त्यांनी ऊत्तम रित्या साऊथ इंडिया मध्ये पक्षाला फायदा होईल अश्या प्रकारचेच नियोजन आहे . केरळ सारख्या राज्यात यात्रा १८ दिवस तर उत्तर प्रदेश सारख्या राज्यात यात्रा फक्त तीनच दिवस आहे. या वरूनच काँग्रेसच राजकारण कळून येत.
राहुल गांधींनाही गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पंतप्रधान पदाचे उमेदवार मानलं जात आहे. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अशा प्रकारे थेट जनतेत जात नाहीत, पत्रकार परिषदा घेत नाहीत, अशा टीका त्यांच्यावर वारंवार होत असतात. अशातच राहुल गांधींनी आपला प्रतिस्पर्धी आणि त्याच्या कमकुवत बाजूंवर थेट वार केल्याचं दिसत आहे. त्यामुळं त्याचा आता कितपत फायदा होतो, हे पाहण्यासारखं आहे.द्वेषामुळे दुभंगलेल्या देशाला एकत्र करण्यासाठी, तसंच मोदी सरकारचं महागाई आणि रोजगारासंदर्भातलं अपय़श याच्याविरोधात लढण्यासाठी ही भारत जोडो यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेला चांगलीच प्रसिद्धी मिळतेय. मोठ्या प्रमाणात गर्दीही होत आहे. मात्र निवडणुकांचं काय? केवळ गर्दी जमवल्याने मतांच्या रुपातलं यश मिळतंच असं नाही. त्यासाठी थेट ग्राऊंड लेव्हलवर प्रयत्न करावे लागतात.सध्या गुजरात आणि हिमाचल च्या निवडणूका जवळ आल्या आहेत पण सध्या काँग्रेसच संघटन खूप कमकुवत असल्याने येथे त्यांचा सुपडा साफ होईल असा प्राथमिक अंदाज आहे. या यात्रेचा त्या निवडणुकीवरती खरंच फायदा होईल का हे सांगू शकत नाही. जेव्हा हि यात्रा चालू असेल तेव्हा निवडणुकीचा प्रचार कोण करणार ? सगळंच सध्या तरी काँग्रेस मध्ये अधांतरी आहे
काँग्रेसची सध्याची अवस्था अशी आहे की जे आहे ते वाढवायचा आहे आणि जे नाही आहे ते परत मिळवायचा आहे. काँग्रेसने चतुराईने भारत जोडो यात्रा साऊथ ला जास्त दिवस ठेवली आहे. जेणेकरून त्यांचा साऊथ मधला मतदार जागृत होईल आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील. काँग्रेसला जर परत सत्तेत यायचे असेल तर त्यांना पहिल्यांदा त्यांचा भरकटलेला कार्यकर्ताला मार्गावर आणायला लागेल. आणि असा एक नेतृत्व उभ करावा लागेल कि जे महा बलाढ्य मोदी शाह या जोडीला टक्कर देऊ शकेल. त्याची सुरुवात होईल कि नाही हे भविष्यातच समजेल. सध्या या भारत जोडो यात्रेत अनेक विरोधी पक्ष हि सामील होत आहे . महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेना भारत जोडो यात्रेला सामील होणार आहे अस प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे . काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवडणुक आणि यात्रा एकाच काळात होत असल्याने यांची चर्चा होत आहे याचा फायदा काँग्रेसला होत आहे. तरीही अजून पक्षाला लांबचा पल्ला गाठायचा आहे त्यासाठी कणखर नेतृत्व आणि सक्षम कार्यकर्ते हवेत त्याशिवाय भाजप सारखा भला मोठा पर्वत त्यांना सर करता येणार नाही