खूप दिवस झाले सतत एकच नाव लोकांच्या अवती भवती फिरत आहे. कोणताही न्युझ चॅनेल लावा किंवा सगळ्या समाज माध्यमावर एकाच च नाव चर्चेत आहे. त्या माणसाचे संबंध सगळ्या मोठ्या नेत्या सोबत चांगले आहे.त्यांच्या संपत्ती मध्ये गेल्या दोन वर्षात जी वाढ झाली आहे ते बघून कोणाचे हि डोळे पांढरे होतील . आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यां बरोबर तर त्याचे खूपच चांगले आहे .आपले प्रधानमंत्र्याचे ते लंगोटी यारच अस धरून चला . जेवढे चांगले संबंध प्रधानमंत्र्यांसोबत आहेत तेवढेच त्यांचे वाईट संबंध राहुल गांधी बरोबर आहे. सकाळ पासून रात्री पर्यंत काँग्रेसचे प्रिन्स राहुल गांधी फक्त एकाच नावाचा जप करत असतात . आता तर ते नाव नाव फक्त राहुल गांधी यांना त्यांचा नावाचा टॅटूच काढायचा बाकी आहे. आता ते नाव म्हणजे थोड्या दिवसासाठी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम शांतीलाल अदानी. तर भारत खूप वर्ष झाले टॉप वर फक्त अंबानी होते, टॉप वर म्हणजे श्रीमंतांच्या यादीत . मधेच दोन वर्ष पूर्वी एक नाव सतत लोकांच्या कानी पडू लागला ते म्हणजे गौतम अदाणी. बघायला गेला तर अदानी हे नाव गुजर...