Skip to main content

अडाणी कि अदानी ??

 खूप दिवस झाले सतत एकच नाव लोकांच्या अवती भवती फिरत आहे. कोणताही न्युझ चॅनेल लावा किंवा सगळ्या समाज माध्यमावर एकाच च नाव चर्चेत आहे. त्या माणसाचे संबंध सगळ्या मोठ्या नेत्या सोबत चांगले आहे.त्यांच्या संपत्ती मध्ये गेल्या दोन वर्षात जी वाढ झाली आहे ते बघून कोणाचे हि डोळे पांढरे होतील . आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यां बरोबर  तर  त्याचे खूपच चांगले आहे .आपले प्रधानमंत्र्याचे ते  लंगोटी यारच अस धरून चला . जेवढे चांगले संबंध प्रधानमंत्र्यांसोबत आहेत तेवढेच त्यांचे वाईट संबंध राहुल गांधी बरोबर आहे. सकाळ पासून रात्री पर्यंत काँग्रेसचे प्रिन्स  राहुल गांधी फक्त एकाच नावाचा जप करत असतात . आता तर ते नाव नाव फक्त राहुल गांधी यांना त्यांचा नावाचा टॅटूच काढायचा बाकी आहे. आता ते नाव म्हणजे थोड्या दिवसासाठी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम शांतीलाल  अदानी. 

तर भारत  खूप वर्ष झाले टॉप वर फक्त अंबानी होते, टॉप वर म्हणजे श्रीमंतांच्या यादीत . मधेच दोन वर्ष पूर्वी एक नाव सतत लोकांच्या कानी पडू लागला ते म्हणजे गौतम अदाणी. बघायला गेला तर अदानी हे नाव गुजरात मध्ये नव नाही  पण बाकीच्या भारतातील लोकं साठी ते जरा नवीनच होते. गेल्या दहा वर्षात अदानी यांनी जी संपत्ती कमावली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. 'फोर्ब्स' च्या श्रीमंतांच्या  यादीत ते दोन महिन्या पूर्वी पर्यंत दुसऱ्या क्रमांकावर होते . किराणा माल, खाणी, रेल्वे विमानतळ, बंदरं आणि वीज कंपन्या असा अनेक क्षेत्रात त्यांचे उद्योगधंदे आहेत. भारतीय उद्योगपती गौतम अदानी फ्रांसच्या एलवीएमएच च्या बर्नॉल्ड अनोर्ल्ट यांना मागे ठेवून जगात दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले होते गेल्या पाच वर्षांत अदानी समुहाने विमानतळं, सिमेंट, तांबे उद्योग, रिफायनरी, डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन, पेट्रोकेमिकल्स, रस्ते निर्माण आणि सौर उर्जा अशा क्षेत्रांमध्ये भरपूर गुंतवणूक केली आहे.

गुजराती कुटुंबांमध्ये आताच्या 21व्या शतकात तसे पहिल्या पिढीचे उद्योगपती फारसे सापडत नाहीत. सगळे दुसऱ्या नाहीतर तिसऱ्या पिढीतले उद्योजक असतात.कारण, उद्योगाची मुहुर्तमेढ वडील किंवा आजोबांनी 1970-80च्या दशकांत केलेली असते. आणि 1990च्या दशकांत अर्थव्यवस्था खुली झाल्यावर पुढच्या पिढीने छोटेखानी व्यापार वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेला असतो.गुजराती कुटुंबातली अशी शंभर तरी उदाहरणं सापडतील. पण, यापैकी अंबानी कुटुंबीय आणि त्यानंतर 2000 पासून अदानी कुटुंबाने आपला डंका आधी देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि पुढे जागतिक पातळीवरही पिटला आहे . जगात अनेक उद्योगामध्ये यांच्या गुंतवणूक आहेत . 

अदानींनी  शिक्षण आपल्यासाठी नाही असं स्वत:चं स्वत: ठरवून त्यांनी गुजरात विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर अभ्यासक्रमाला दुसऱ्याच वर्षी सोडचिठ्ठी दिली. दूर म्हणजे घरातील कापड व्यवसाय नाकारून थेट मुंबईला आले . मुंबईला आल्यावर त्यांनी झवेरी बाजार गाठल आणि व्यापार सुरू केला . पहिली 2-3 वर्षं हिरे वेचण्याचं काम करत असतानाच त्यांनी स्वत:ची हिरे ब्रोकरेज कंपनी थाटली. आणि विशेष म्हणजे पहिल्या तीन वर्षांतच त्यांची गणना या व्यापारातल्या लक्षाधीशांमध्ये व्हायला लागली. विशीतच अदानी 'मिलियनेअर' झाले

मुंबईत हिरे व्यापारात त्यांचा जम बसत असतानाच त्यांचा मोठा भाऊ मनसुखलाल यांनी अहमदाबादमध्ये प्लास्टिक व्यवसाय सुरू केला. त्यांनी गौतम यांना मदतीसाठी बोलावलं.गौतम यांनी अधिकृतपणे एका संघटित उद्योग क्षेत्रात 1981 मध्ये हे असं पाऊल ठेवलं.पण, ही फॅक्टरी सांभाळतानाही त्यांना या धंद्यातलं भवितव्य दिसू लागलं. त्यांनी प्लास्टिक व्यवसायाला पॉलीमर आणि पीव्हीसी आयात करणाऱ्या कंपनीमध्ये बदललं. 1991मध्ये अर्थव्यवस्था खुली झाल्यावर आणि खाजगीकरण शक्य झाल्यावर अडाणी यांना विस्ताराची नवीन स्वप्नं दिसू लागली. कारण , एक्स्पोर्ट बरोबरीने खाजगी जेट्टी स्थापन करण्याचं त्यांचं स्वप्न गुजरात सरकारने पूर्ण केलं. मुंद्रा बंदराची व्यवस्था सांभाळण्याचं खाजगी कंत्राट गुजरात सरकारने 1995मध्ये काढलं. आणि ते गौतम अदानी यांनाच मिळालं. बंदर व्यवस्थापनाच्या व्यवसायावर त्यांची नजर पहिल्यापासून होती.आताच्या घडीला अदानी पोर्ट्स ही देशातली सगळ्यात मोठी खाजगी बंदर व्यवस्थापन कंपनी आहे. मुंद्रा हे खाजगीरित्या सांभाळलं जाणाऱ्या बंदरातून वर्षाला 21 कोटी टनाइतक्या वस्तू आणि मालाचा व्यापार होतो. तर 1996मध्ये स्थापन झालेली अडाणी पॉवर ही कंपनी देशातली सगळ्यात मोठी खाजगी उर्जा निर्मिती करणारी कंपनी आहे.

 बोलतात बोलता अदानी यांनी मोठा साम्राज्य उभा केल. बघायला गेला तर त्यांची संपत्ती मागच्या दहा वर्षात  भक्कम वाढलेली आहे. , 2012 पासून त्यांच्या कंपन्यांचे शेअर अगदी सरळ रेषेत वर चढले आहेत. त्यांमध्ये 400% ची वाढ झाली आहे. आणि देश पातळीवर महत्त्वाचे असे प्रकल्प मिळवण्यामध्ये अदानी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेली जवळीक कारणीभूत ठरल्याचा आरोप वारंवार होत आला आहे. 

माणसाच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत चालेल असा थोडी  लिहला आहे. अडाणी पण याला अपवाद नाही . अमेरिकन रिसर्च  टीम हिडेन्सबर्ग यांनी एक भली मोठी  रिसर्च  रिपोर्ट अदाणी यांच्यावर काढली. जशी हि रिपोर्ट बाहेर अली तस संपूर्ण देशात बबाल झाला . यामध्ये अदाणी यांनी कसे घोटाळे, केले कशी संपत्ती वाढवली, कशा अनेक शेल कंपन्या बनवून  स्वताच्याच कंपनीचे शेअरचा भाव कशे वाढवले हे सगळं  त्या रिपोर्ट मध्ये लिहला. आता अशी रिपोर्ट आल्यावर अडाणी यांचे धाबे दणाणले. दोन दिवसात  अडाणी यांचे कंपनीचे शेयरचे भाव पडायला लागले. त्यांच्या वैयक्तिक  संपत्ती मध्ये उतार होऊ लागला. जगातल्या श्रीमंतांच्या  यादीतून ते बाहेर फेकले गेले . अनेक विरोधक त्यांचे विरोध करू लागले. देशातील सत्तेत असलेले भाजप त्यांची पाठराखण करू लागला . 
आता काळ तर अदानी साठी  कठीण आहे  काही जण त्यांची पाठराखण करत आहेत तर काही जण विरोध. भविष्यातच आपल्याला समजेल कि गौतम अदानी आहेत कि अडाणी....?????
                                                                             
                    टीप : लेखातील काही घडामोडी अनेक वर्तमानपत्रातून संशोधन करून घेतले आहे.

Popular posts from this blog

हिंदुत्वाचा राखणदार ...

 उठा उठा सकाळ झाली अयोध्याला निघायची वेळ आली.आजच्या दिवशी जो तो उठतो आहे आणि तो अयोध्याला जात आहे.अयोध्या म्हणजे एक अस शहर झाला आहे कि तेथे जगाच्या सगळ्या सुखसोयी मिळणार आहे.सध्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रमध्ये अयोध्याला एक विशेष महत्व मिळाले आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची शाल अंगावर घेतली आणि अयोध्या दौरा करणार याची घोषणा केली. बघा ना हेच जर तुम्ही दहा दहावर्षा पूर्वी  ऐकलं असत तर तुम्हाला विश्वास बसला नसता.यांच्या  पाठोपाठ आता महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पण अयोध्या दौरा ला जाणार आहे असे शिवसेनेने घोषित केले आहे . पण आजच्या घडीला हेच सत्य आहे. आता ज्यांना राजकारणातला थोड फार माहित असेल त्यांना समजेलच कि ते तिथे का चाललेले आहेत.त्यांनी हिंदुत्व हि विचारधारा स्वीकारली असून त्या वरच ते आता राजकारण करणार हे स्पष्ट झालं आहे . धर्म आणि राजकारण  चा नातं अतूट आहे. राजकारण मध्ये या मुद्या शिवाय मत मागताच येत नाही. बघा ना केंद्रात असलेलं भाजप सरकार म्हणत आम्हीच खरे हिंदुत्ववादी आणि आणि महाराष्ट्र मध्ये असललेली शिवस...

खेळ मांडला

शिवसेना म्हंटलं कि पहिल नाव येत ते शिवसेना प्रमुख बाळ केशव  ठाकरे  उर्फ बाळासाहेब ठाकरे . त्यांचे भाषण, त्यांचे व्यक्त्तिमत्व, त्यांची देहबोली या साठी ते प्रसिद्ध होते . महाराष्ट्र स्थापन झाल्यांनतर मुंबईमध्ये  मराठी माणसाची गळचेपी मोठ्या प्रमाणात होत होती. अनेक मराठी तरुणांना नोकरी असो वा व्यवसाय त्यामध्ये दुय्यम वागणूक मिळत होती. हाच  अन्याय मोडून  काढण्यासाठी बाळ ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली  आणि मुंबई व महाराष्ट्र मध्ये ठाकरे पर्व चालू झाल.  मुंबईतील व त्याच्या परिसरातील सामान्य मुलांच्या मनात शिवसेना बद्द्ल आदर वाढू लागला आणि मोठ्या प्रमाणात युवक शिवसेनेमध्ये प्रवेश करू लागले. अनेक आंदोलन झाली शिवसेनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता पण निवडणुकी मध्ये पाहिजे तस यश मिळत नव्हत. मग आता शिवसेनेनं मराठी सोबत हिंदुत्त्व हि विचारधारा पण प्रखरपणाने मांडण्यास सुरवात केली.  १९८९ साली शिवसेनेनं भारतीय जनता पार्टी सोबत युती केली. दोन्ही पक्ष हिंदुत्वासाठी लढण्यासाठी एकत्र आले. शिवसेनेने त्यांच्या सुवर्ण काळात  पहिले  बंड बघितल ते छगन ...