देशात सध्या फक्त हिंदू- मुस्लिम येवढच चाललंय. रामनवमी असो वा हनुमान जयंती असो दोन्ही दिवशी देशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार दिसून आला. गेल्या काही काळातील काही घटना बघितल्या तर असा दिसून येईल कि देशात वातावरण काय आहे. तम्ही वर्तमानपत्र, टीव्ही चॅनेल्स पाहिलात तर तुम्हाला सगळीकडे हिंदू- मुस्लिम हिंसाचाराच्याच बातम्या दिसतील. अहो ताज उदाहरणच घ्याना, आताच दिल्लीच्या जहांगीरपुरी मध्ये झालेली दंगल. हनुमान जयंतीला निघालेल्या यात्रेमध्ये काही लोकांनी दगडफेक केली आणि दंगल उसळली. पण या सगळ्या हिंदू- मुस्लिम च्या राड्यात बेरोजगारी आणि महागाई हे मुद्दे बाजूला पडले आहेत.सर्व राजकीय पक्ष मशिदीवरच्या भोंग्यावरुन, हिजाबवरून, हलाल मटनावरून दंगा करत आहेत. कोण म्हणतय तू जर भोंगा खाली घेतला नाही तर मी हनुमान चालीस लावेन तर कोण म्हणतय मी तुझ्यावर ईडी लावेन. काही नेत्यांच्या संपत्ती बघून डोळे पांढरे होतील अशी गत आली आहे आता. राज्यातले अनेक मंत्री तर थेट जेल मध्ये आहेत. काहींचा संबंध तर थेट दाऊद इब्राहिमशी आहे आणि एक जण तर १०० कोटी गोळा करण्याच्या आरोपावर जेल मध्ये गेला.२०१४ मध्ये ज्यांनी...