' ए लाव रे तो व्हिडिओ' ते 'उत्तर प्रदेश मध्ये विकास होतोय' इथपर्यंत आता महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय.आपल्या भूमिका पहिल्यापासून ठामपणे मांडणारा व लोकांना आपलासा वाटणारा नेता हीच त्याची ओळख त्याने घर जरी बदललेले असले तरी लोकांना न्याय त्याच्या इथेच मिळणार यातच त्याचा विजय.सभांना होणारी मोठी गर्दी पण निवडणुकांवेळी हीच गर्दी मतांमध्ये फिरवू न शकणे हेच त्याचे दुर्दैव्य. कधीकाळी हाच शिवसेनेचा पुढील सर्वेसेवा होईल असे लोकांना वाटत होते पण नशिबाचे चक्र अशे जे फिरले आणि स्वतःचा नवीन पक्ष काढून जुन्या पक्षातल्या मोठ्या नेत्यांना न फोडता नवीन साथीदारांना घेऊन पुढे जाऊन 'जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र' घडवू असे ठामपणे मांडणारा नेता आज संघर्ष करतोय स्वतःच्या पक्षाला नवसंजीवनी देण्याचा.
सध्या तरी महाराष्ट्रातील तीन पक्ष एकसाथ गुण्या गोविंदाने नांदत असल्याचे दाखवत आहेत आणि शिवसेना जी स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष आहे असे बोलतो त्याची या महाविकासआघाडी मध्ये कोंडी झाल्याचे दिसते . महाविकास आघाडी मधील उर्वरित दोन्ही पक्ष हे सेक्युलॅरिझम या विचारधारा वर मत मागतात त्यामुळे त्यात शिवसेनेची मोठी अडचण झाली याचाच फायदा म्हणजे शिवसेनेची हिंदुत्वाची जागा मनसेला घ्यायची आहे.दोन वर्षा पूर्वी एक भली मोठी सभा घेऊन पक्षाच्या झेंडाचा रंग बदलून त्यांनी हिंदुत्वाची शाल अंगावर घेतली. काही मनसैनिकांनी तर राज ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट अशी उपाधी देऊन टाकली . त्यानंतर राज अयोध्या दौरा करणार अशा चर्चा होत्या पण कोरोना हा महाभयानक विषाणू आला आणि सगळं थोड्या वेळासाठी शांत झालं.सगळं जग या विषाणूमुळे त्रस्त होत तस महाराष्ट्रात पण अनेक समस्या लोकांना उदभवत होत्या. जेव्हा लॉकडाऊन हळू हळू संपत होत अनेक लोक समस्या घेऊन राज ठाकरे यांच्या कडे जात होते . राज्यात राज यांच सरकार नाही ते विरोधी पक्षात आहेत पण त्यांचा एकच आमदार आहे.तरीही लोक त्यांच्याकडे जातात आणि समस्या मांडतात.लोकांना वाटत राज यांचा स्वभाव पाहता आपली काम त्यांच्या कडे गेल्यावर पटकन होतील. एसटी कर्मचारी,डॉक्टर ,रेल्वे कर्मचारी किंवा सामान्य नागरिक असे अनेक लोक राज ठाकरे यांच्या घरी जाऊन आले.सध्या लोक जरी राज ठाकरे यांच्या सभेत जातात,त्यांच्या कडे अडचणी घेऊन जातात पण जेव्हा निवडणूक येतात तेव्हा मनसेला मत देत नाही.पक्षाचे हातावर मोजता येतील असे उमेदवार उभे राहतात, पक्षाचा जो मूळ असतो तो म्हणजे कार्यकर्ता तोच जमिनीवर काम करत नाही. पक्षाची संघनात्मक बांधणी जशी पाहिजे तशी नाही. एकच आमदार निवडून येतो तो पण दुसऱ्या पक्षाचा सहकार्यामुळे, अस म्हणता येईल. जो पक्ष याच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये १३ आमदार निवडून आणतो तोच पक्ष आज अस्तित्वासाठी लढतो आहे.
आत्ताच झालेल्या गुढीपाडवा मेळावा मध्ये राज ठाकरे यांनी त्यांचा ज्वलंत हिंदुत्व लोकांसमोर मांडले.त्यामध्ये त्यांनी अनेक मुख्य विषयांना हाथ घातला मुख्यतः त्यांनी राष्ट्रवादी व शरद पवार हे कशे जातीवादीय आहेत यावर भर दिला.पवारांना त्यांनी थेट निशाणावर घेतल. पवार असो किंवा शिवसेनेचे संजय राऊत कोणालाच नाही सोडला.त्यांनी त्यांच्या ठाकरे शैलीत सगळ्यांचा समाचार घेतला पण ते भाषणातले जे शब्द होते ते राज यांचे वाटत नव्हते.जस राज यांचा भाषण रंगत तस ते भाषण रंगल नाही.जे मशिदी वरील भोंगे असतात त्यांचा समोर हनुमान चालिसा लावा अस थेट आवाहन त्यांच्या कार्यकर्त्यांना केल.पुढच्याच दिवशी काही मनसैनिकांनी भोंग्यांवर हनुमान चालीसा लावली. अनेक ठिकाणी कार्यकर्ते गोळा झाले पण पुण्यामधले मनसेचा चेहरा असलेले आणि राज यांचे विश्वासू शिलेदार वसंत तात्या मोरे यांनी असे म्हटले कि 'मी एक लोकप्रतिनिधी असल्याने व माझ्या प्रभागात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव असल्याने मला काय भोंगे लावता येणार नाही'. राज ठाकरे यांचा आदेश काही अनेक मनसैनिकांना कळलाच नाही अनेक कार्यकर्ते संभ्रमात होते. ह्याच गोंधळात वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून गच्छन्ति झाली. व त्यांचे सहकारी साईनाथ बाबर याना पुणे शहर शहराध्यक्ष पदाची धुरा दिली.अस झाल असताना हि पण वसंत हे आपण मनसैनिक म्हणून काम करत राहणार असे बोलत होते. अनेक पक्षांनी त्यांना आपल्या पक्षात या अश्या ऑफर दिल्यात पण ते राज ठाकरे यांच्या सोबतच राहणार असे सांगत होते. सगळी कडे संभ्रम असल्याने राज अजून एक सभा घेणार असे त्यांनी जाहीर केले आई सभेला 'उत्तरसभा' असे नामकरण केले.त्यांची उत्तर सभा ठाणे येथील गडकरी रंगायतनच्या समोर झाली.सभेला मोठी गर्दीही झाली त्यांनी गुडीपाडवा मेळाव्यात जे मुद्दे मांडले त्याचा उदारणाशी स्पष्टीकरण दिले. नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांना समजावले व परत राष्ट्रवादी व शरद पवार यांना टार्गेट केल.त्याच बरोबर शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ही टीका केली राज असे म्हणाले की संजय राऊत शिवसेनेचे कमी राष्ट्रवादीचेच जास्त वाटतात. राज यांनी संजय राऊत याना प्रबोधनकार ठाकरे यांचा शब्द असलेला 'लवंडू' हा शब्द संबोधिला. त्यांनी मुंब्रा मध्ये कशे आतंकवादी सापडतात ह्याची एक लिस्टच सभेत मांडली व जितेंद्र आव्हाड यांना तोंडावर पाडल.अशा प्रकारे जशी राज ठाकरे यांची सभा होते तशीच ही सभा पण संपली. राज यांच्या हिंदुत्ववादी राजकारणात घुसल्यामूळे महाराष्टाचे राजकारण राज ठाकरे यांच्या अवतीभवती फिरू लागले. आजच्या काळात सगळ्याच पक्षांना आरती असो व हनुमान चालिसा म्हणायला राज यांनी भाग पाडल.महाविकास आघाडी मध्ये असल्यामुळे शिवसेनेच मवाळ झालेलं हिंदुत्व यामुळे परत जहाल होताना दिसले. आपणच खरे हिंदुत्ववादी आहोत असे शिवसेना नेते सांगत सुटले.
थोड्याच दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये महापालिकेच्या निवडणूक होणार आहेत त्यामध्ये आता चुरशीची लढत होणार आहे हे नक्कीच.