Skip to main content

महागाईचा भोंगा

 देशात सध्या फक्त हिंदू- मुस्लिम येवढच चाललंय. रामनवमी असो वा हनुमान जयंती असो दोन्ही दिवशी देशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार दिसून आला. गेल्या काही काळातील काही घटना बघितल्या तर असा दिसून येईल कि देशात वातावरण काय आहे. तम्ही वर्तमानपत्र, टीव्ही चॅनेल्स पाहिलात तर तुम्हाला सगळीकडे हिंदू- मुस्लिम हिंसाचाराच्याच बातम्या दिसतील. अहो ताज उदाहरणच घ्याना, आताच दिल्लीच्या जहांगीरपुरी मध्ये झालेली दंगल. हनुमान जयंतीला निघालेल्या यात्रेमध्ये काही लोकांनी दगडफेक केली आणि दंगल उसळली. 

पण या सगळ्या हिंदू- मुस्लिम च्या राड्यात बेरोजगारी आणि महागाई हे मुद्दे बाजूला पडले आहेत.सर्व राजकीय पक्ष मशिदीवरच्या भोंग्यावरुन, हिजाबवरून, हलाल मटनावरून दंगा करत आहेत. कोण म्हणतय तू जर भोंगा खाली घेतला नाही तर मी हनुमान चालीस लावेन तर कोण म्हणतय मी तुझ्यावर ईडी लावेन. काही नेत्यांच्या संपत्ती बघून डोळे पांढरे होतील अशी गत आली आहे आता. राज्यातले अनेक मंत्री तर थेट जेल मध्ये आहेत. काहींचा संबंध तर थेट दाऊद  इब्राहिमशी आहे आणि एक जण तर १०० कोटी गोळा करण्याच्या आरोपावर जेल मध्ये गेला.२०१४ मध्ये ज्यांनी देशाला अच्छे दिनचे स्वप्न दाखवले ते सध्या काय करत आहेत ते त्यांनाच माहिती. सध्या केंद्रात असनाऱ्या एक महिला मंत्री १० वर्षा पूर्वी सिलेंडर घेऊन महागाई वर बोंबलत होत्या त्याच आज मूग गिळून गप्पं बसल्या आहेत.

धार्मिक वातावरण पेटवून हिंसाचार घडवणाऱ्या नेत्याला काय माहित या हिंसा घडवणाऱ्या झुंडीतले अनेक तरुण बेरोजगार आहेत. महागाईचे चटके तर सर्वसामान्यांनाच बसतात. नेते मंडळी तर धनाढ्य असतात त्यांना कसली पडली आहे महागाईची चिंता. म्हणून एकही राजकीय नेता महागाई, वीजटंचाई अन बेरोजगारीवर चकार शब्द काढत नाही. सगळ्या बातम्यांमध्ये महागाई व बेरोजगारीचे मुद्दे कायमच टाळले जातात किंवा दाखवलेच जात नाही. सध्या  तरी भारतीय मीडिया ही  बातमी सांगणारी नव्हे तर बातमी बनवणारी झाली आहे. काही रिपोर्टर तर खुलेआम कोणत्यातरी पक्षाची बाजू घेतात समजतच नाही पत्रकार कोण आहे आणि पक्षाचा प्रवक्ता कोण आहे. देशामध्ये तर दोन प्रकारचे पत्रकार झाले आहेत एक म्हणजे गोदि  मीडिया दुसरी म्हणजे चाई बिस्कुट पत्रकार.

सध्या देशात दर वर्षाला वाढणारा  महागाईचा दर प्रसिद्ध केला जातो. त्या नुसार, गेल्या मार्च २०२२ मध्ये ६.९५% इतका दर होता. जो ऑक्टोबर २०२० नंतरचा उच्चांक आहे. भारत सरकार तर्फे महागाईचा दार जास्तीत जास्त किती असावा यासाठी एक ठरवला गेला म्हणजे ६.२५% इतका  ज्याची मर्यादा ओलांडली गेली आहे म्हणजेच देशात महागाईचा भडका उडाला आहे.खाद्य तेलाच्या किमतीचा दर ११.६४% आहे. मांस व मासे यांच्या किंमतीत तर पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जो लिंबू  ५ रुपयाला दोन मिळायचे तेच आता १० रुपयाला मिळतात. तुम्ही म्हणाल यात काय पण जरा जाऊन तुमच्या आईला किंवा बायकोला विचारा कि भाज्यांचा भाव काय आहे तिने नाही महागाईचा पाढा वाचून दाखवला तर नवलच. 

सलग ६ महिने झालेत अन्नधान्याच्या किंमती वाढतच चालल्या आहेत. कपडे आणि चप्पलाच्या महागाईचा दर ९.४% टक्के इतका आहे. पेट्रोल तर ११० रुपयाच्या खाली यायचा नावाचं घेत नाही. लोक या गोष्टी वर मीम्स बनवतात पण जेव्हा पेट्रोल पंपावर गेल्यावर जेव्हा खिशा खाली होतो तेव्हा रडायची पाळी  येते . 

याच अश्या महागाई असो व बेरोजगारी या विषयावर राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे पण हे राजकीय पक्षांना  तर लोकांच्यात धार्मिक तेढ  निर्माण करून मत मिळवायची आहे आणि आपली पोळी शेकून घ्यायची आहे. त्यामुळे आपणच ठरवा तूम्हाला तुमच भविष्य भांडणात घालवायच आहे कि अजून कशात...  

 


Popular posts from this blog

अडाणी कि अदानी ??

 खूप दिवस झाले सतत एकच नाव लोकांच्या अवती भवती फिरत आहे. कोणताही न्युझ चॅनेल लावा किंवा सगळ्या समाज माध्यमावर एकाच च नाव चर्चेत आहे. त्या माणसाचे संबंध सगळ्या मोठ्या नेत्या सोबत चांगले आहे.त्यांच्या संपत्ती मध्ये गेल्या दोन वर्षात जी वाढ झाली आहे ते बघून कोणाचे हि डोळे पांढरे होतील . आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यां बरोबर  तर  त्याचे खूपच चांगले आहे .आपले प्रधानमंत्र्याचे ते  लंगोटी यारच अस धरून चला . जेवढे चांगले संबंध प्रधानमंत्र्यांसोबत आहेत तेवढेच त्यांचे वाईट संबंध राहुल गांधी बरोबर आहे. सकाळ पासून रात्री पर्यंत काँग्रेसचे प्रिन्स  राहुल गांधी फक्त एकाच नावाचा जप करत असतात . आता तर ते नाव नाव फक्त राहुल गांधी यांना त्यांचा नावाचा टॅटूच काढायचा बाकी आहे. आता ते नाव म्हणजे थोड्या दिवसासाठी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम शांतीलाल  अदानी.  तर भारत  खूप वर्ष झाले टॉप वर फक्त अंबानी होते, टॉप वर म्हणजे श्रीमंतांच्या यादीत . मधेच दोन वर्ष पूर्वी एक नाव सतत लोकांच्या कानी पडू लागला ते म्हणजे गौतम अदाणी. बघायला गेला तर अदानी हे नाव गुजर...

हिंदुत्वाचा राखणदार ...

 उठा उठा सकाळ झाली अयोध्याला निघायची वेळ आली.आजच्या दिवशी जो तो उठतो आहे आणि तो अयोध्याला जात आहे.अयोध्या म्हणजे एक अस शहर झाला आहे कि तेथे जगाच्या सगळ्या सुखसोयी मिळणार आहे.सध्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रमध्ये अयोध्याला एक विशेष महत्व मिळाले आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची शाल अंगावर घेतली आणि अयोध्या दौरा करणार याची घोषणा केली. बघा ना हेच जर तुम्ही दहा दहावर्षा पूर्वी  ऐकलं असत तर तुम्हाला विश्वास बसला नसता.यांच्या  पाठोपाठ आता महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पण अयोध्या दौरा ला जाणार आहे असे शिवसेनेने घोषित केले आहे . पण आजच्या घडीला हेच सत्य आहे. आता ज्यांना राजकारणातला थोड फार माहित असेल त्यांना समजेलच कि ते तिथे का चाललेले आहेत.त्यांनी हिंदुत्व हि विचारधारा स्वीकारली असून त्या वरच ते आता राजकारण करणार हे स्पष्ट झालं आहे . धर्म आणि राजकारण  चा नातं अतूट आहे. राजकारण मध्ये या मुद्या शिवाय मत मागताच येत नाही. बघा ना केंद्रात असलेलं भाजप सरकार म्हणत आम्हीच खरे हिंदुत्ववादी आणि आणि महाराष्ट्र मध्ये असललेली शिवस...

खेळ मांडला

शिवसेना म्हंटलं कि पहिल नाव येत ते शिवसेना प्रमुख बाळ केशव  ठाकरे  उर्फ बाळासाहेब ठाकरे . त्यांचे भाषण, त्यांचे व्यक्त्तिमत्व, त्यांची देहबोली या साठी ते प्रसिद्ध होते . महाराष्ट्र स्थापन झाल्यांनतर मुंबईमध्ये  मराठी माणसाची गळचेपी मोठ्या प्रमाणात होत होती. अनेक मराठी तरुणांना नोकरी असो वा व्यवसाय त्यामध्ये दुय्यम वागणूक मिळत होती. हाच  अन्याय मोडून  काढण्यासाठी बाळ ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली  आणि मुंबई व महाराष्ट्र मध्ये ठाकरे पर्व चालू झाल.  मुंबईतील व त्याच्या परिसरातील सामान्य मुलांच्या मनात शिवसेना बद्द्ल आदर वाढू लागला आणि मोठ्या प्रमाणात युवक शिवसेनेमध्ये प्रवेश करू लागले. अनेक आंदोलन झाली शिवसेनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता पण निवडणुकी मध्ये पाहिजे तस यश मिळत नव्हत. मग आता शिवसेनेनं मराठी सोबत हिंदुत्त्व हि विचारधारा पण प्रखरपणाने मांडण्यास सुरवात केली.  १९८९ साली शिवसेनेनं भारतीय जनता पार्टी सोबत युती केली. दोन्ही पक्ष हिंदुत्वासाठी लढण्यासाठी एकत्र आले. शिवसेनेने त्यांच्या सुवर्ण काळात  पहिले  बंड बघितल ते छगन ...