उठा उठा सकाळ झाली अयोध्याला निघायची वेळ आली.आजच्या दिवशी जो तो उठतो आहे आणि तो अयोध्याला जात आहे.अयोध्या म्हणजे एक अस शहर झाला आहे कि तेथे जगाच्या सगळ्या सुखसोयी मिळणार आहे.सध्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रमध्ये अयोध्याला एक विशेष महत्व मिळाले आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची शाल अंगावर घेतली आणि अयोध्या दौरा करणार याची घोषणा केली. बघा ना हेच जर तुम्ही दहा दहावर्षा पूर्वी ऐकलं असत तर तुम्हाला विश्वास बसला नसता.यांच्या पाठोपाठ आता महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पण अयोध्या दौरा ला जाणार आहे असे शिवसेनेने घोषित केले आहे . पण आजच्या घडीला हेच सत्य आहे. आता ज्यांना राजकारणातला थोड फार माहित असेल त्यांना समजेलच कि ते तिथे का चाललेले आहेत.त्यांनी हिंदुत्व हि विचारधारा स्वीकारली असून त्या वरच ते आता राजकारण करणार हे स्पष्ट झालं आहे . धर्म आणि राजकारण चा नातं अतूट आहे. राजकारण मध्ये या मुद्या शिवाय मत मागताच येत नाही. बघा ना केंद्रात असलेलं भाजप सरकार म्हणत आम्हीच खरे हिंदुत्ववादी आणि आणि महाराष्ट्र मध्ये असललेली शिवस...