Skip to main content

हिंदुत्वाचा राखणदार ...

 उठा उठा सकाळ झाली अयोध्याला निघायची वेळ आली.आजच्या दिवशी जो तो उठतो आहे आणि तो अयोध्याला जात आहे.अयोध्या म्हणजे एक अस शहर झाला आहे कि तेथे जगाच्या सगळ्या सुखसोयी मिळणार आहे.सध्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रमध्ये अयोध्याला एक विशेष महत्व मिळाले आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची शाल अंगावर घेतली आणि अयोध्या दौरा करणार याची घोषणा केली. बघा ना हेच जर तुम्ही दहा दहावर्षा पूर्वी  ऐकलं असत तर तुम्हाला विश्वास बसला नसता.यांच्या  पाठोपाठ आता महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पण अयोध्या दौरा ला जाणार आहे असे शिवसेनेने घोषित केले आहे . पण आजच्या घडीला हेच सत्य आहे. आता ज्यांना राजकारणातला थोड फार माहित असेल त्यांना समजेलच कि ते तिथे का चाललेले आहेत.त्यांनी हिंदुत्व हि विचारधारा स्वीकारली असून त्या वरच ते आता राजकारण करणार हे स्पष्ट झालं आहे

. धर्म आणि राजकारण  चा नातं अतूट आहे. राजकारण मध्ये या मुद्या शिवाय मत मागताच येत नाही. बघा ना केंद्रात असलेलं भाजप सरकार म्हणत आम्हीच खरे हिंदुत्ववादी आणि आणि महाराष्ट्र मध्ये असललेली शिवसेना म्हणते आम्हीच हिंदुत्ववादी.सध्याच्या घडीला प्रत्येक पक्षाला आपणच  कसे कडवट हिंदुत्ववादी आहोत हे सिद्ध करायचा आहे. सध्या सत्तेत असलेली शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत आहे. आणि हे पुरोगामी विचारसरणीचे पक्ष म्हणून ओळखले जातात आणि ह्यांच्या सोबत शिवसेना सत्तेत आहे यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वावर भाजप आणि मनसे हे दोन्ही पक्ष आक्षेप घेतात. सध्या शिवसेनेच हिंदुत्व जरा सॉफ्ट झाल्याने याचा फायदा  आपल्याला कसा होईल याची चाचपणी मनसे करत आहे.. आणि थोड्याच महिन्यात महानगर पालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणूक पण होणार आहेत  यात मनसे ला शिवसेनाच वोट बँक  पाहिजे आहे. जो शिवसेनेचा मतदार काँग्रेस सोबत शिवसेना गेल्यामूळे नाराज आहे त्यांना आपल्याकडे कसा खेचता येईल या साठी सध्या मनसे प्रयत्नशील आहे . सध्याच्या घडीला महाराष्ट्रात भाजपाला पण एक पार्टनर हवा आहे. सध्याच्या घडीला तीन विरुद्ध एक असा सामना होत असल्याने भाजपाला थोड राजकारण करायला जड जात असल्याने मनसे सोबत जाऊन निवडणुका लढऊ असा एक मतप्रवाह भाजप मध्ये आहे .मनसे चा इतिहास बघितला तर हा पक्ष काही भागामध्ये प्रभावशाली आहे आणि मुंबई मध्ये याची चांगली व्होट बँक आहे. मागील मुंबई महानगरपालिकेच्या  निवडणुकी मध्ये भाजपाला निसटता पराभव झाला आणि शिवसेनेचा महापौर मुंबईत बसला होता पण जर यावेळी मनसेला सोबत घेतला तर मनसे  शिवसेनेचे मते खातील आणि याचा फायदा भाजपला होईल असे भाजपा मधील काही नेत्यांना वाटते. आणि मनसेला पण जर नवसंजीवनी पाहिजे असेल तर त्याना हि युती केल्या शिवाय पर्याय नाही. कारण मनसेची परिस्तिथी सध्या खूपच बिकट आहे. त्यांचा पक्ष संघटन मजबूत नाही. पण त्यांच्या कडे राज ठाकरे यांच्या सारखा महाराष्ट्रातील एक नंबरचा वक्ता आहे . त्यांच्या सभेला गर्दी खूप होते. सध्या मनसेने जे हिंदुत्व विचारधारा घेतली आहे ती भाजपाला पोषक आहे जे भाजप उघड पणे  बोलू  शकत नाही ते राज ठाकरे उघड पणे बोलू शकतात. आणि हेच भाजपाला हवे आहे .पण राज ठाकरे यांनी पूर्वी परप्रांतीयांना खूप विरोध केला होता त्यामुळे त्यांची भूमिका परप्रांतीय विरोधी अशी तयार झाली होती . बघायला गेला तर सध्या मुंबई मध्ये परप्रांतीय मत महत्वाची आहेत.जर राज ठाकरे यांच्या सोबत युती केली तर ती मत आपल्या पासून दूर जातील असे भाजप मधील काही लोकांना वाटत आहे. पण ज्या प्रकारे मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. आणि जर मनसेची परप्रांतीय यविरोधी भूमिका पुसली गेली तर भाजप आणि मनसेची युती होऊ शकते असं वक्तव्य भाजपचे अनेक नेत्यांनी केले आहे. त्यामुळेच मनसे कडून पण कट्टर हिंदुत्वाची भूमिका मोठ्या प्रमाणात नजीकच्या काळात दिसते. ज्या प्रकारे राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यां विरोध आंदोलन केल हे त्यामधील एक उदाहरण.

मुख्यमंत्री यांनी सभा घेऊन आमच हिंदुत्व कस खरा आहे हे दाखवायचा प्रयत्न  केला. त्यांनी भाजप आणि राज ठाकरे यांच्यवर जोरदार टीका केली.सध्या तरी सभा घेण्याचे फ्याड सुरु आहे अनेक सभा नेत्यांच्या होत आहेत आता तर निवडणूक पण जाहीर होतील तेव्हा तर हा संघर्ष अजून मोठा होईल एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतील कोण असली कोण नकली हे उघडपणे नेते मंडळी बोलूवून दाखवतील.भविष्यात पण धर्मावरून राजकारण होणारच आहे हे तर नक्कीच...

Popular posts from this blog

अडाणी कि अदानी ??

 खूप दिवस झाले सतत एकच नाव लोकांच्या अवती भवती फिरत आहे. कोणताही न्युझ चॅनेल लावा किंवा सगळ्या समाज माध्यमावर एकाच च नाव चर्चेत आहे. त्या माणसाचे संबंध सगळ्या मोठ्या नेत्या सोबत चांगले आहे.त्यांच्या संपत्ती मध्ये गेल्या दोन वर्षात जी वाढ झाली आहे ते बघून कोणाचे हि डोळे पांढरे होतील . आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यां बरोबर  तर  त्याचे खूपच चांगले आहे .आपले प्रधानमंत्र्याचे ते  लंगोटी यारच अस धरून चला . जेवढे चांगले संबंध प्रधानमंत्र्यांसोबत आहेत तेवढेच त्यांचे वाईट संबंध राहुल गांधी बरोबर आहे. सकाळ पासून रात्री पर्यंत काँग्रेसचे प्रिन्स  राहुल गांधी फक्त एकाच नावाचा जप करत असतात . आता तर ते नाव नाव फक्त राहुल गांधी यांना त्यांचा नावाचा टॅटूच काढायचा बाकी आहे. आता ते नाव म्हणजे थोड्या दिवसासाठी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम शांतीलाल  अदानी.  तर भारत  खूप वर्ष झाले टॉप वर फक्त अंबानी होते, टॉप वर म्हणजे श्रीमंतांच्या यादीत . मधेच दोन वर्ष पूर्वी एक नाव सतत लोकांच्या कानी पडू लागला ते म्हणजे गौतम अदाणी. बघायला गेला तर अदानी हे नाव गुजर...

खेळ मांडला

शिवसेना म्हंटलं कि पहिल नाव येत ते शिवसेना प्रमुख बाळ केशव  ठाकरे  उर्फ बाळासाहेब ठाकरे . त्यांचे भाषण, त्यांचे व्यक्त्तिमत्व, त्यांची देहबोली या साठी ते प्रसिद्ध होते . महाराष्ट्र स्थापन झाल्यांनतर मुंबईमध्ये  मराठी माणसाची गळचेपी मोठ्या प्रमाणात होत होती. अनेक मराठी तरुणांना नोकरी असो वा व्यवसाय त्यामध्ये दुय्यम वागणूक मिळत होती. हाच  अन्याय मोडून  काढण्यासाठी बाळ ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली  आणि मुंबई व महाराष्ट्र मध्ये ठाकरे पर्व चालू झाल.  मुंबईतील व त्याच्या परिसरातील सामान्य मुलांच्या मनात शिवसेना बद्द्ल आदर वाढू लागला आणि मोठ्या प्रमाणात युवक शिवसेनेमध्ये प्रवेश करू लागले. अनेक आंदोलन झाली शिवसेनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता पण निवडणुकी मध्ये पाहिजे तस यश मिळत नव्हत. मग आता शिवसेनेनं मराठी सोबत हिंदुत्त्व हि विचारधारा पण प्रखरपणाने मांडण्यास सुरवात केली.  १९८९ साली शिवसेनेनं भारतीय जनता पार्टी सोबत युती केली. दोन्ही पक्ष हिंदुत्वासाठी लढण्यासाठी एकत्र आले. शिवसेनेने त्यांच्या सुवर्ण काळात  पहिले  बंड बघितल ते छगन ...